loader
Breaking News
Breaking News
Foto

आरवलीत अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; 74 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा

संगमेश्वर : तालुक्यातील आरवली बाजारपेठ परिसरात अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत तब्बल 74,520 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ३० जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास आरवली बाजारपेठ येथे सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईदरम्यान सुभाष भिकाजी खसासे (वय ४७) आणि प्रभाकर अंकुश पिळणकर (वय ५४), दोघेही रा. आरवली, ता. संगमेश्वर यांच्याकडून परवानगीशिवाय विविध विदेशी व देशी मद्याच्या बाटल्या वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ट्युबॉर्ग बिअर, मास्टर्स डिलाइट, मॅकडॉवेल्स नं. १, तसेच विविध देशी मद्याच्या बाटल्यांसह वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण ₹74,520 किमतीचा माल समाविष्ट आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg