मुंबई (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील वाकवली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत 'शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था' स्थापन करण्याच्या प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. मंत्रालयात पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या रखडलेल्या प्रस्तावाची गंभीर दखल घेत, अधिकाऱ्यांना त्रुटी तत्काळ दूर करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) मंत्रालयात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पदव्युत्तर संस्थेच्या प्रस्तावाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी प्रस्तावातील त्रुटी त्वरित दुरुस्त करून सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले. विशेष म्हणजे, कोकणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रस्ताव सन २०२४ पासून का प्रलंबित आहे? असा थेट जाब त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारल्याने प्रशासकीय पातळीवर मोठी धावपळ उडाली आहे. अशी माहिती ना.कदम यांनी दिली. या बैठकीला उपस्थित असलेले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी सकारात्मक भूमिका मांडली. प्रस्तावातील १० पैकी तब्बल ९ त्रुटी अवघ्या एका दिवसात दूर करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. प्रशासकीय पातळीवर वेगाने काम करून या विषयाचा पुढील आढावा घेण्यासाठी आता सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणातील कृषी क्षेत्राचे भवितव्य आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन, वाकवली येथे उपलब्ध असलेल्या ३१.६० हेक्टर जागेवर ही संस्था उभारण्यात येणार आहे. या प्रक्रियेला गती देऊन लवकरात लवकर यावर अंतिम निर्णय घेण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीला राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह कृषी विभाग व मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.