संगमेश्वर(सत्यवान विचारे)- शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कुचांबे या संस्थेने सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि कर्मचारी यांच्या विश्वासाच्या बळावर आर्थिक प्रगतीची नवी शिखरे गाठली आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये संस्थेने ठेवींमध्ये १०० कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार केल्यानंतर आता १२५ कोटींच्या ठेवींचा टप्पाही गाठला असून, आगामी आर्थिक वर्षासाठी तब्बल २०० कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
संस्थेची २८ वी सर्वसाधारण वार्षिक सभा नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आणि आर्थिक प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश थेराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने आर्थिक विस्ताराबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान, ग्राहकाभिमुख सेवा आणि सभासदांच्या आर्थिक उन्नतीवर भर दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी संस्थेने ठेवींमध्ये १०० कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. सभासद व ठेवीदारांच्या विश्वासाचे प्रतीक असलेल्या या कामगिरीनिमित्त संगमेश्वर येथील कुणबी भवनमध्ये ‘स्वप्नपूर्ती सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास हजारो सभासदांची उपस्थिती लाभली होती. तसेच मुंबई व पुणे येथेही स्नेहमेळावे घेण्यात आले. यानंतर संस्थेने १२५ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा यशस्वीपणे पार केला असून, आता २०० कोटींच्या ठेवींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मागील वर्षात धायरी आणि बोरिवली येथे दोन नवीन शाखा सुरू करण्यात आल्या. तसेच दिवा शाखेसाठी स्वमालकीची जागा घेऊन शाखेचे नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय कानाल, जनरल मॅनेजर रवींद्र थेराडे, डेप्युटी जनरल मॅनेजर ईशा घडशी, सरपंच वंदना थेराडे, समन्वयक अनिल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे, विशाखा कुवळेकर, पंचायत समिती सदस्य अपर्णा जाधव, उद्योजक विजय कुवळेकर, बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक मुकेश मेश्राम, शाखा अधिकारी सुदाम पाटमास आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सिताराम थेराडे, रुपेश गोताड, प्रकाश रांजणे, किशन चिले, दीपक चव्हाण, विजय दुदम, विष्णू विंजले, मयूर भिंगार्डे, सचिन चव्हाण, विनायक पांडुरंग जाधव, सिताराम धाडवे, अनिल मोरे, आत्माराम भागडे, शांताराम जड्यार आदी उपस्थित होते. सभेदरम्यान ठेवीदार व सभासदांनी संस्थेविषयी मनोगत व्यक्त केले. सभासदांचा विश्वास, कर्मचारी वर्गाची कार्यतत्परता आणि संचालक मंडळाचे मार्गदर्शन यामुळेच शिववैभव पतसंस्थेने अल्पावधीत भरीव प्रगती केली असून, आगामी काळात २०० कोटींच्या ठेवींचे उद्दिष्टही संस्था निश्चितपणे पूर्ण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.