loader
Breaking News
Breaking News
Foto

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन व नृत्य स्पर्धेत दैदीप्यमान यश

सावंतवाडी - क्रांतिदिनाचे औचित्य साधून यशवंतराव भोसले सैनिक स्कूलद्वारे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन व नृत्य स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केले. देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यामध्ये प्रशालेतील निधी शिर्के, अवनी शेर्लेकर, मन्वा साळगावकर, प्रत्युशा घोगले, ध्यानी बथानी, अरोही सावंत, सौजन्या काजरेकर, आराध्या आजगावकर, अनिका सुकी, लिशा सामंत, भुवन दळवी, पृथ्वीराज गवस, देवांग सारंग, सरस नाईक या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विद्यार्थ्यांना शेळेतील नृत्य शिक्षक महेश जांभोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. यामध्ये, धन्यवी शृंगारे, सई नाईक, गायत्री तानावडे, नाविण्या कोरगावकर, अनोमा कामत, कवीश पेडणेकर, उगम वेर्लेकर, योगांक करिवडेकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

टाईम्स स्पेशल

या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या संगीत शिक्षिका ईश्वरी तेजम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. यासर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे संस्थापक रुजुल पाटणकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्राची साळगावकर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निधी सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg