loader
Breaking News
Breaking News
Foto

दुधामध्ये कॉस्टिक सोडा आणि शॅम्पू ? एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा खुलासा

मुंबई - खुल्या दुधाच्या विक्रीमध्ये कॉस्टिक सोडा आणि शॅम्पू टाकून सिंथेटिक दुध तयार केले जाते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. डिजीटल ट्रेसेबीलीटीच्या मार्फत दुध विक्रेत्यांची साखळी कार्यान्वित आहे, या प्रक्रियेस थांबविण्यासाठी प्रयत्न केले जातच आहेत, पण हे आरोग्याच्या दृष्टीने फार धोकादायक आहे, अशी माहिती अन्न व भेसळ खात्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रसार माध्यमांकडे बोलताना दिली. त्यांनी एका मुलाखतित सांगितले की, कथित सिंथेटिक आणि केमिकल असलेल्या दुधाचा कारभार मोठा आहे. त्याचे नेटवर्क मोठे आहे. अनेक लोक असे दुध तयार करतात. विशेष तज्ञांचे म्हणणे आहे की, या भेसळ दुधाला सतत उपयोगात आणल्याने पचन संस्था, लिव्हर आणि किडनीवर गंभीर परिणाम होवू शकतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फूड फार्मरला दिलेल्या मुलाखतीत आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, एक व्यक्ती स्कीम्ड पॉवडर खरेदी करत होता, तर दुसरा केमिकल आणि इमल्सीफायर सप्लाय करत होता. त्याचा शोध घेतला. कारण ही खरेदी दुधाच्या भेसळसाठी होती. कॉस्टिक सोडा अणि शॅम्पूचा वापर करुन तयार केलेल्या दुधाची खुलेआम विक्री झालेली आहे. हे बेकायदेशीर आणि खुपच गंभीर प्रकरण असल्याचे त्यांनी सांगितले. दुधातील भेसळ तयार करणारी एक साखळी असून काही शेतकरी, दुध संकलन केंद्र, चिलींग सेंटर आणि पुरवठा साखळी यामध्ये सहभागी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. हे दुध शुद्ध पुरवठा करणार्‍या संस्था आणि दुध डेअरी पर्यंत पोहोचू शकते, असा धोका त्यांनी व्यक्त केला, याचा सखोल शोध घेवून कारवाई केली जाईल. दुधाच्या प्रत्येक थेंबाला त्याच्या उत्पादनापर्यंत जावून शोध घेतला जाईल, रोजच्या दुध उप्तादनाचा डिजीटल रेकॉर्ड तयार केला जात आहे. कोणत्याही गावातून सामान्य उत्पादनापेक्षा जर जास्त दुध येवू लागले तर यंत्रणा तातडीने त्याची ओळख करुन कारवाई करेल, पशुपालन विभागाने दुग्धजनावरांचे डिजीटल रेकॉर्ड ठेवण्याच्या सूचना ही केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

शुद्ध दुध नैसर्गिक प्रोटिन, कॅल्शियम हेल्थी फॅट विटॅमीन आणि मिनीरल्स स्त्रोत असलेला असतो तर केमिकल असलेले दुध दिसायला तसेच असते हा धोका आहे. दुधासारखा दिसणारा केमिकल दुध वापराल आले तर त्यामुळे जीवाला धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे पोटात दुखणे उलटी, आणि गळ्यामध्ये त्रास जाणवू शकतो, असे पब्लीक हेल्थ एक्सपर्ट डॉ. जगदीश हिरेमठ यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg