loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय उद्यानविद्या दिनानिमित्त वायंगणी येथे माहिती केंद्राचे उद्घाटन

वायंगणी, : राष्ट्रीय उद्यानविद्या दिनानिमित्त उद्यानविद्या महाविद्यालय, दापोलीच्या RHWE विद्यार्थ्यांच्या ‘कृषिवीर' ग्रुपच्या वतीने वायंगणी येथील श्री. वायंगणेश्वर क्षेत्रपाल मंदिरात माहिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्येचे प्रमुख डॉ. किरण माळशे होते. तसेच वायंगणी गावचे पोलिस पाटील नितीन खाडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते माहिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय उद्यानविद्या दिनाचे महत्त्व विशद करून उद्यानविद्येचा शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासातील महत्त्वपूर्ण वाटा स्पष्ट केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या माहिती केंद्रामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विकसित केलेल्या विविध वाणांची तसेच उद्यानविद्याविषयक तंत्रज्ञानांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी व ग्रामस्थांना विद्यापीठाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची व सुधारित वाणांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सहभागात्मक ग्रामीण मूल्यांकन (PRA) अंतर्गत तयार केलेल्या वायंगणी गावाच्या नकाशाचे ग्रामस्थांसमोर सादरीकरण करून नकाशातील विविध संसाधने, शेती, जलस्रोत व इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती समजावून सांगितली.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमामुळे उद्यानविद्याविषयक तंत्रज्ञान ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासोबतच विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील प्रत्यक्ष कार्याचा अनुभव मिळाला. राष्ट्रीय उद्यानविद्या दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम ज्ञानविस्तार व ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. डी. शिर्के, डॉ. किरण माळशे, विषयतद्य डॉ. आशिष शिगवण, तसेच मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. नितेश दळवी, डॉ. थोरात, डॉ. काळे, डॉ. राऊत, डॉ. दोसानी, डॉ. तोरणे व डॉ. वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे संपूर्ण गावातून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg