loader
Breaking News
Breaking News
Foto

इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीराम मोरेश्वर गोगटे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

देवगड(प्रतिनिधी)- जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या परीक्षेत कु. मनोमय मृत्युंजय मुणगेकर (६८.०%), कु. अनुज मंगेश भोवर (५९.३%), कु. चिन्मयी योगेश भुजबळ (५६.६%), कु. लिशा उमेश आंबेरकर (५४.६%), कु. दुर्वा हेमंत आईर (४४.६%) तसेच कु. श्रावणी संतोष कावले (४४.०%) यांनी यश संपादन करून शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्या विकास मंडळ, जामसंडेचे अध्यक्ष अँड. अजित गोगटे, सचिव प्रवीण जोग, शाळा समितीचे अध्यक्ष प्रसाद मोंडकर, मुख्याध्यापक सुनील जाधव, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच ग्रामस्थांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची अथक मेहनत, पालकांचे प्रोत्साहन तसेच शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रभावी अध्यापन आणि योग्य नियोजन यांचा मोलाचा वाटा असल्याचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी सांगितले. ‘‘विद्यार्थ्यांनी भविष्यातही याच जिद्दीने परिश्रम घेत, शैक्षणिक क्षेत्रात आणखी मोठे यश संपादन करावे,’’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg