loader
Breaking News
Breaking News
Foto

कोळथरे येथे दापोली उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ‘हरितसंगिनी’ गटने साजरी केला ‘उद्यानविद्या दिन’; रानभाज्यांचे प्रदर्शन, फ्रूट कार्व्हिंग आणि पाककला स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

(दापोली-सागर गोवळे) - कोळथरे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ‘हरितसंगिनी’ विद्यार्थी गटाच्या वतीने कोळथरे येथील ‘आई आनंदी गोपाळ महाजन माध्यमिक शाळेत’ उद्यानविद्या दिन मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रानभाज्यांचे प्रदर्शन आणि फ्रूट कार्व्हिंग (फळांपासून कलाकृती) असे विविध उपक्रम राबवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्यानविद्या दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुष्पगुच्छ बनवणे आणि फ्रूट कार्व्हिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गावातील महिलांसाठी रानभाज्यांपासून विविध चवदार पदार्थ बनवण्याची पाककला स्पर्धा घेण्यात आली. या सर्व स्पर्धांना विद्यार्थी आणि ग्रामस्थ महिलांकडून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. पी. सी. माळी, डॉ. प्रविण झगडे, डॉ. विशाल केळसकर, शाळेचे उपाध्यक्ष गजानन बडे, मुख्याध्यापक मंगेश नरवणकर, सचिव रमेश कनगुटकर, प्रगतशील शेतकरी सुनील पेठे आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. पी. सी. माळी व डॉ. प्रविण झगडे यांनी स्पर्धांचे परीक्षण करून विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले आणि विजेत्यांना बक्षीस वितरण करून गौरवले.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ‘हरितसंगिनी’ गटाच्या धनश्री चौगुले, श्रावणी कालेकर, साक्षी वालपकर, श्रद्धा कोतवाल, विशाखा आंबवले, यशिका करकेरा, अनया वराडकर, सानिका नाकील, अनुजा साळुंखे, सिद्धी धनावडे, सानिया पासिलकर, दिया म्हादये, सृष्टी पुरी व श्रावणी आरेकर या विद्यार्थिनींनी केले. उपक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. डी. शिर्के, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे तसेच मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. नितेश दळवी, डॉ. थोरात, डॉ. शिगवण, डॉ. राऊत, डॉ. दोसाणी, डॉ. तोरणे आणि डॉ. गुढदे यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg