खेड(प्रतिनिधी)- खेड नगरपरिषदेमध्ये महायुतीची एकहाती सत्ता स्थापन होऊन आठ महिने पूर्ण झाले असून या ८ महिन्यांच्या कार्यकाळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर खेड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या सूचनेनुसार, आखण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण योजना आणि विषयांना मंजुरी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. नगरपरिषदेच्या टिप्पणीनुसार शहराचा कायापालट करण्यासाठी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शिफारस केलेल्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा होऊन पुढील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. या संपूर्ण विकासकामांची सविस्तर माहिती आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये गुरुवारी सकाळी देण्यात आली. या प्रसंगी नगराध्यक्ष माधवी बुटाला, गटनेते निकेतन पाटणे आणि नगरसेवक संजय मोदी यांच्यासह नगर परिषदेचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नगरसेवक संजय मोदी यांनी नगरपरिषदेत घेण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या निर्णयांची सविस्तर माहिती दिली.
या सभेमध्ये क्रीडा संकुल आणि विविध भूखंडांच्या नामांतराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. महाडनाका येथील नगरपरिषद मालकीच्या आरक्षण क्रमांक १४ मधील क्रीडांगणास ‘रामदासभाई कदम क्रीडा संकुल’ असे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासोबतच महाडनाका येथील अंतिम भूखंडावरील व्यापारी संकुलास आमदार कै. तुकाराम बाबूराव कदम व्यापारी संकुल आणि ध जंक्शन रोड येथील भूखंडास कै. हिराचंद परशराम बुटाला आरोग्यधाम असे नाव देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. शहर विकासाच्या दृष्टीने विकास कामांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. सुमारे ४० वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या तसेच पूरग्रस्त आणि धोकादायक ठरलेल्या कै. बाळासाहेब पाटणे व्यापारी संकुल आणि प्रबोधनकार ठाकरे उद्यान शेजारील जुन्या व्यापारी संकुलाच्या इमारती पाडून त्या ठिकाणी अद्ययावत नवीन व्यापारी संकुले उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खेड नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याच्या प्रस्तावालाही गती दिली जात आहे.
शहरातील पर्यटन आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी बंदरनाका येथील बोट क्लब परिसर विकसित केला जाणार आहे. तसेच आरक्षण क्रमांक १४ मधील २.८० हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा मैदान, फ्लड लाईट्स, प्रेक्षक गॅलरी आणि विविध खेळांसाठी आधुनिक सुविधा उभारण्याचे काम वेगाने पुढे जात आहे. यासोबतच शहरातील खाडीतलाव व सरोवरांचे संवर्धन करून तेथे कारंजे बसवणे व सौंदर्य खुलवणे यावर भर दिला जाणार आहे. नगर परिषदेच्या या बैठकीत शहरातील स्वच्छता अभियान, घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालये बांधणे आणि जगबुडी नदीवरील गणेश विसर्जन घाटाच्या दुरुस्तीसारख्या नागरी सुविधांवरही सकारात्मक चर्चा झाली. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचा योग्य वापर करणे आणि शहरातील नालेसफाईच्या कामांना गती देणे, यावर नगरपरिषदेने भर दिला असून, आगामी कार्यकाळात खेड शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे नगरसेवक संजय मोदी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.