loader
Breaking News
Breaking News
Foto

मुक्ताई ॲकेडमी आयोजित कॅरम स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद!

सावंतवाडी (प्रतिनिधी) - मुक्ताई ॲकेडमीने सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेत विदयार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सावंतवाडी शहर मर्यादित असलेल्या या स्पर्धेत दहा शाळांमधील पहिली ते दहावीतील एकाहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कोरोना कालावधीनंतर मुक्ताई ॲकेडमीने पहिल्यांदाच सावंतवाडीत विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे मोठ्या कॅरम स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेचे आयोजन पाटणकर वाड्यातील ॲकेडमीच्या कॅरम प्रशिक्षण केंद्रात करण्यात आले. स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या पालकांनी स्पर्धा आयोजित केल्याबददल आनंद व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे ज्येष्ठ कॅरमप्रेमी नरेंद्र मसुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, सरचिटणीस स्नेहा पेडणेकर आणि राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर तसेच पालक उपस्थित होते. नरेंद्र मसुरकर यांनी मुक्ताई ॲकेडमी गेली दहा वर्षे मुलांसाठी कॅरम व बुदधिबळ खेळासाठी करत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करुन विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांचं मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले.

टाईम्स स्पेशल

आपल्या आई-वडीलांबरोबरच गुरुचं स्थान महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. मुक्ताई ॲकेडमीतर्फे कॅरम व बुद्धिबळ खेळांचे प्रशिक्षण देतात, वेळोवेळी स्पर्धा घेतात, हे कौतुकास्पद असल्याचे मसुरकर म्हणाले. यावेळी नरेंद्र मसुरकर आणि बाळकृष्ण पेडणेकर यांनी कॅरम बोर्डवर खेळुन स्पर्धेचे उद्घाटन केले. स्नेहा पेडणेकर यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg