वैभववाडी (प्रतिनिधी) - SIR अभियान हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे, एकही पात्र व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सर्व व्यक्तींची माहिती जमा करून आपले काम गांभीर्याने केले पाहिजे. यासाठी वैभववाडी तालुक्यात ०३ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीला मतदारसंघातील संबंधित सर्व बीएलए, शाखाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उबाठा कणकवली विधानसभा प्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले. मतदार यादी पुनर्रिक्षण अभियान SIR च्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभववाडी तालुका कार्यकारिणीची बैठक शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी वैभववाडी तालुका शिवसेना शाखा येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
या महत्त्वाच्या बैठकीला तालुकाप्रमुख नंदू शिंदे, महिला तालुका संघटक दिव्या पाचकुडे,तालुका सचिव गुलजार काझी, विभाग प्रमुख यशवंत गवाणकर, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर पांचकुडे, नगरसेवक मनोज (बंडू) सावंत, उपविभाग प्रमुख स्वप्नील रावराणे आणि युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. SIR अभियानासंदर्भात BLA यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि कामाचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात BLA यांची बैठक घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. या बैठका सोमवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजीपासून सुरू होणार आहेत. या अंतर्गत पहिली बैठक कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी दुपारी ४:०० वाजता हेत येथील वसंत खानविलकर यांच्या घरी आयोजित करण्यात आली आहे.
त्यानंतर दुसरी बैठक कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघात सायंकाळी ६:०० वाजता बांधवाडी (कोकिसरे) येथील यशवंत गवाणकर यांच्या घरी संपन्न होईल. तर या सत्रातील तिसरी बैठक लोरे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी रात्री ७:०० वाजता आचिर्णे , कडूवाडी येथील संतोष कडू यांच्या घरी होणार आहे. या जाहीर केलेल्या वेळेत आणि ठिकाणी संबंधित मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन वैभववाडी तालुका कार्यकारिणीच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले आहे.या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीला जिल्हाप्रमुख वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत याची नोंद घ्यावी.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.