संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कडवई येथे रानभाजी महोत्सव व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना स्थानिक जैवविविधता, रानभाज्यांचे पोषणमूल्य, पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले सृष्टी ज्ञान संस्था, देवरुखचे कुणाल अणेराव यांनी सांगितले की, पावसाळ्यात कोकणात सुमारे दीडशे प्रकारच्या रानभाज्या उगवतात. या भाज्यांमध्ये भरपूर पोषणमूल्य असून त्यांचे महत्त्व समजून घेतल्यास त्याचा लाभ सर्वसामान्यांना होऊ शकतो. स्थानिक रानभाज्यांचा आहारात अधिकाधिक समावेश केल्यास किमान चार महिने तरी कोकणातील नागरिकांना स्थानिक अन्नसंपत्तीवर आधारित उपजीविका शक्य होईल. रानभाजी महोत्सवासारखे उपक्रम या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
वनरक्षक सूरज तेली यांनी विद्यार्थ्यांना पावसाळ्यात घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनां बाबत मार्गदर्शन केले. पावसाळ्यात वन्यजीव मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने रात्री एकटे फिरणे टाळावे, अत्यावश्यक काम असल्यासच मोठ्या व्यक्तीसोबत बाहेर पडावे तसेच हातात काठी व टॉर्च घेऊनच बाहेर जावे, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांची ओळख, त्यांचे औषधी गुणधर्म, पोषणमूल्य आणि उपयोग याविषयी माहितीपूर्ण सादरीकरण केले. उत्कृष्ट माहिती सादर करणाऱ्या तीन गटांना सृष्टी ज्ञान संस्था, देवरुखचे कुणाल अणेराव यांच्या वतीने रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमानंतर शाळेच्या परिसरात मुख्याध्यापक शेषेराव अवघडे आणि वनरक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला. या कार्यक्रमास मुख्याध्यापक पर्यवेक्षक संतोष साळुंके, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडूकर, सुप्रिया काळे, आबासाहेब शेंडगे, प्रदीप कानाल तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम राष्ट्रीय हरीत सेना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख निलेश कुंभार यांनी केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.