loader
Breaking News
Breaking News
Foto

आज दाभोळे हायस्कूल येथे आमदार किरण सामंत यांच्याहस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

देवळे (प्रकाश चाळके) - वनविभाग चिपळूण रत्नागिरी व शेतकरी लाकूड व्यापारी संघटना तालुका संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष प्रजातीची लागवड व संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 31जुलै रोजी आमदार (भैय्या) सामंत, यांचे हस्ते संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय दाभोळे येथे होणार आहे. " झाडे लावा, झाडे जगवा " या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमाला प्रोत्साहन लाभावे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचवा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी चिपळूण रत्नागिरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये, उपसभापती प्रफुल्ल बाईत, सहाय्यक संरक्षक प्रियांका लगड, परीक्षेत वन अधिकारी विक्रम गुरव, पंचायत समिती सदस्या दिपाली जाधव, दाभोळे सरपंच राजेश रेवाळे, दाभोळे हायस्कूलचे अध्यक्ष संजय कांबळे, शेतकरी लाकूड व्यापारी संघटना तालुका संगमेश्वरचे अध्यक्ष किरण जाधव हे उपस्थित राहणार असून बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संगमेश्वर तालुका लाकूड व्यापारी संघटना सदस्य तसेच ग्रामपंचायत तिवरे तर्फ देवळे चे उपसरपंच ओंकार सुर्वे यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg