loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे गावठाण शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप

चिरणी(सुरेश देवरुखकर) - खेड तालुक्यातील, लोटे गावठण येथील, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य खेडचे अजय चाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य अजय चाळके, खेड पंचायत समिती माजी उपसभापती महेश गोवळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश चाळके, शाळेचे मुख्याध्यापक कुठरेकर, शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. शाळेचे शिक्षक व कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. तसेच शाळेचे मुख्याध्यापक कुठरेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg