loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल, जामगे मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

खेड - शिवतेज आरोग्य सेवा संस्था, खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे या प्रशालेमध्ये दिनांक २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षक यादव यांनी महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुंचे महत्त्व सांगणारी भाषणे व कविता यांचे सादरीकरण केले. शिक्षकांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट करून गुरु-शिष्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सन्मान केला. प्रशालेचे प्राचार्य डॉ. खोत व कमांडंट श्रीकिशन यांनी विद्यार्थ्यांना गुरुंचा आदर राखून ज्ञानार्जनासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला.

टाइम्स स्पेशल

दुपारच्या सत्रात प्रशालेमध्ये सहावी ते आठवी (लहान गट ) व नववी ते बारावी (मोठा गट ) या गटामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यास पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येलपले यांनी तर आभार प्रदर्शन तुडयेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट, प्राचार्य, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg