loader
Breaking News
Breaking News
Foto

साडवली येथे विहीरीत पडलेला बिबट्या वनखात्याकडून सुरक्षित पिंजर्‍यात

रत्नागिरी (किशोर मोरे) - संगमेश्वर तालुक्यातील मौजे साडवली या ठिकाणी राजेश पर्शराम चव्हाण नेदरवाडी यांच्या खासगी विहीरीत मध्यरात्री बिबट्या पडल्याचे सकाळी आढळून आले. याची माहिती परिमंडळ वनअधिकारी संगमेश्वर देवरुख यांना देण्यात आली. त्यानंतर वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. विहीर आयताकृती असल्याने अडचणीचे होते, तसेच २० फूट खोल होती, अशा अडचणीच्या ठिकाणी विहीरीत पिंजरा सोडण्यात आला. पिंजरा सोडल्यानंतर अडचणीत असलेला बिबट्या त्वरीत पिंजर्‍यात सुरक्षित जेरबंद झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर सदर बिबट्याची सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु चिकित्सालय देवरुख यांचे कडून तपासणी करून घेऊन सदर बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. सदरील रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल संगमेश्वर देवरुख सागर गोसावी, वनरक्षक साखरपा सहयोग कराडे, वनरक्षक फुणगूस आकाश कडुकर, वनरक्षक आरवली सुरज तेली, वनरक्षक दाभोळे सुप्रिया काळे, प्राणी मित्र अनुराग आखाडे यांनी केली.

टाईम्स स्पेशल

सदरील रेस्क्यू ऑपरेशन करतेवेळी पोलीस पाटील साडवली व मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांचेही रेस्क्यू ऑपरेशनसाठी चांगले सहकार्य लाभले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख सागर गोसावी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg