loader
Breaking News
Breaking News
Foto

एलटीटी स्कूलमध्ये पालक-शिक्षक संघाची सभा संपन्न

संगलट(खेड)- खेड शहरात असलेली प्रख्यात खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूल व ज्युनि. कॉलेज, खेड या प्रशालेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील ‘पालक - शिक्षक संघाची सभा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी समन्वयक जॉय, समन्वयक एल्सी, मुख्याध्यापक जी. बी. सारंग, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर, पालक प्रतिनिधी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सभेच्या सुरुवातीस सहा. शिक्षक महेदवी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व सभेचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर पालक शिक्षक संघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये पालक-शिक्षक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक जी. बी. सारंग, उपाध्यक्ष उत्तमकुमार जैन, सचिव महेदवी, सहसचिव सादिका हमदुले, खजिनदार वैदेही चिंचघरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी निवडीबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यानंतर सहा. शिक्षक सावंत सर यांनी १० वी व १२ बोर्ड परीक्षा निकाल तसेच इतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चमकलेल्या विद्यार्थ्यांची नावे सांगून विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. सदर सभेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, पालकांच्या समस्या, शैक्षणिक उपक्रम याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

यावेळी कुडाळकर यांनी शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमाविषयी माहिती सांगितली. तर सारंग यांनी पालक शिक्षक संघाचे कार्य, त्याचा शाळेची प्रगती होण्यास होणारा उपयोग तसेच प्रशालेत ऋजणछऊAढखजछ व गएए, छएएढ, उएढ याविषयी करण्यात येणारे मार्गदर्शन याविषयी आपले मत मांडले. तसेच एल्सी यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या, तर यांनी सभेला संबोधित करताना शाळेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे कथन केले सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन महेदवी यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg