loader
Breaking News
Breaking News
Foto

खासदार सुनील तटकरे यांनी चार शब्दात पूर्ण कोड्याचे उत्तर दिले--"आपल्याला रणनीतीराची गरज नाही"

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वादळ उलट्या दिशेने महाराष्ट्रात येण्याची शक्यता बळावताना दिसू लागली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि प्रशांत कुमार यांची भेट झाली आहे, याबाबत रायगड रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांनी चार शब्दातच पूर्ण कोड्याची सोडवणूक केली आहे. त्यांच्या बोलण्यात राजकीय अनुभवाची प्रगल्भता दिसून आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या भेटीवर राष्ट्रादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची ही भेट औपचारिक असावी, पण त्यामध्ये काय चर्चा झाली याची मला माहिती नाही. तसेच आम्ही फिल्डवर काम करणारे कार्यकर्ते आहोत, आठ वेळा अख्खा महाराष्ट्र पालथा घातलाय. त्यामुळे आपल्याला रणनीतीकारांची गरज नाही, असंही सुनील तटकरे म्हणाले. बिहारमध्ये मोठा विजय मिळाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यामध्ये झालेल्या चर्चांमध्ये सुनील तटकरेंच्या कार्यशैलीवर काही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याची माहिती समोर आली. याच मुद्द्यावर बोलताना सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली.

टाइम्स स्पेशल

सुनील तटकरे म्हणाले की, "प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाल्याची माहिती मिळाली. त्यांची ती औपचारिक भेट होती. त्यांची काय चर्चा झाली याबाबत मला माहिती नाही. आम्ही प्रॅक्टिकल आहोत. पवार साहेब, अजितदादा आणि इतर नेत्यांसोबत मी काम केलं आहे. मी माझ्या आयुष्यात निवडणुकीचा सर्व्हे कधीही केला नाही. मला काय असल्या रणनीतीकार किंवा सर्व्हेची गरज नाही. मी फिल्डमध्ये काम करणारा आहे. गावातल्या लोकांना, तरुणाईला भेटल्यानंतर मला अंदाज येतो. मी आठवेळा महाराष्ट्र उलथापालथा केला आहे. राज्याचा कानाकोपरा मला माहिती आहे. चांद्यापासून बांद्यापासून मी माहिती सांगू शकतो."ते रणनीतीकार असतील, पण ते आमच्या पक्षासाठी काम करतात की नाही याची मला माहिती नाही. प्रशांत किशोर यांची नेमणूक झाली असती तर त्याची माहिती मला असती, असं सुनील तटकरे म्हणाले. आम्ही पक्षाचं संघटन बांधत असताना जनतेला, शेतकऱ्यांना, उद्योजकांना नेमकं काय पाहिजे याची माहिती आहे. त्यात कुणाचा सल्ला मिळाला तर तो ठीक आहे, असं तटकरे म्हणाले. प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे म्हणाले की, "काल सदिच्छा भेट झाली म्हणजे त्यांची पक्षाच्या सल्लागारपदी नेमणूक झाली असं समजण्याचं काही कारण नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये आहोत. दादांच्या निधनानंतर जे जे प्रश्न उपस्थित झाले त्यावर आम्ही तेच सांगतोय, आम्ही एनडीएमध्ये आहोत. प्रशांत किशोर हे भाजपच्या विरोधात निवडून आले ती त्यांची भूमिका आहे."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg