loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील फुलांची कहाणी ‘ऋतुरंग’ला राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार.

संगमेश्वर(सत्यवान विचारे)- कोकणातील फुलांची माहिती आणि छायाचित्रांनी सजलेल्या जे. डी. पराडकर लिखित ‘ऋतुरंग’ या पुस्तकाला सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयातर्फे कै. भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ ‘राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुणे येथील चपराक प्रकाशनच्या माध्यमातून प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची निवड झाल्याचे पत्र लेखक जे. डी. पराडकर यांना प्राप्त झाले. ‘बुके नव्हे तर बुक’ या संकल्पनेतून ‘ऋतुरंग’ची निर्मिती करण्यात आली असून, पुस्तकाला निसर्ग अभ्यासक डॉ. उमेश मुंडल्ये यांची प्रस्तावना व स्वाती साठे यांची पाठराखण लाभली आहे.

टाइम्स स्पेशल

दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते ‘ऋतुरंग’चे प्रकाशन झाले होते. पुस्तकाचे मुखपृष्ठ जलरंग चित्रकार विष्णू परीट यांनी साकारले आहे. पुरस्कार वितरण समारंभ २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सोमण सभागृह, सातारा येथे होणार आहे. याबद्दल अश्वमेध ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने व संस्थापक रवींद्र भारती यांनी लेखक जे. डी. पराडकर आणि चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg