loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथील श्री भैरी भवानी मंदिराला सिंधूरत्न समृद्ध योजनेचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी भेट

मकरंद सुर्वे(संगमेश्वर) - संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथील श्री भैरी मनाशी मंदिरास डॉ. विनय नातू यांनी नुकतीच भेट देऊन मंदिरात श्री भैरी भवानीचे दर्शन घेतले. शृंगारपूर येथील हे मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यावेळी शृंगारपूरचे सरपंच विनोद पवार, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, माजी जि. प. सदस्य दीपक जाधव, श्री भैरी भवानी मंदिर शृंगारपूरचे विश्वस्त व पदाधिकारी, दिलीप बडद, श्रीरंग कुंभार, श्रीनिवास पेंडसे, शैलेंद्र पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. विनय नातू यांनी मंदिराच्या उपक्रमांची माहिती घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भेटीवेळी डॉ. विनय नातू यांचा मंदिराच्या वतीने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे आणि मंदिर न्यासाच्या अध्यक्षांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन डॉ. नातूंचा सत्कार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg