मालवण(प्रतिनिधी)- कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (छडड) विभागातर्फे नशामुक्त युवा - विकसित भारत अभियानांतर्गत विविध जनजागृती उपक्रम संपन्न झाले. यानिमित्त दि. ३१ जुलै २०२६ रोजी महाविद्यालय परिसरात नशामुक्त युवा फॉर विकसित भारत — जनजागृती स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयात आकर्षक संदेश व चित्रांसह जनजागृती फलक उभारण्यात आला होता. या फलकावर विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी स्वाक्षरी करून नशामुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. या अभियानात विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण ८३ जणांनी सहभाग नोंदविला.
त्यानंतर दि. २ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या टी. वाय. बी. कॉम. स्मार्ट क्लासरूममध्ये नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान भारताचे पंतप्रधान यांनी देशातील युवकांना संबोधित करताना नशामुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आणि विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. थेट प्रक्षेपणानंतर प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यसनमुक्ती, स्वअनुशासन आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करत व्यसनांपासून दूर राहून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी नशामुक्त युवा शपथ घेऊन व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी कार्य करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. सुमेधा नाईक, डॉ. संकेत बेळेकर, प्रा. योगिता सावंत, प्रा. अनघा टिकले, गौतम मानवर, रिद्धी काजरेकर व अपूर्वा पालव यांनी केले. याप्रसंगी प्रा. मंदार मुंडले तसेच मालवण नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.