loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा सटमटवाडी शाळा दुरुस्तीसाठी निधी मंजूर

बांदा (प्रतिनिधी) - बांदा सटमटवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर कोसळल्याच्या घटनेची दखल घेत शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर व उपसरपंच रत्नाकर आगलावे यांनी या शाळेच्या दुरवस्थेबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांना माहिती देत तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या माहितीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सदर अंगणवाडीची पाहणी करून परिस्थितीची खात्री केली. शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता इमारतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी मंजूर करून दिला आहे. त्यामुळे आता शाळा इमारतीच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला असून, बालकांना सुरक्षित वातावरणात शिक्षण व पोषण आहाराची सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

टाईम्स स्पेशल

ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर व उपसरपंच रत्नाकर आगलावे यांनी या प्रकरणी पाठपुरावा केल्याबद्दल तसेच समस्या जाणून घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg