खेड (प्रतिनिधी) - खेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या निवडणूक प्रभाग कार्यालयांचे उद्घाटन आज माझ्या उपस्थितीत संपन्न झाले. तसेच महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार माधवीताई बुटाला, आणि इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांची प्रत्यक्ष भेट घेत ना कदम यांनी मतदारांशी संवाद साधला. खेड शहरासाठी ११० कोटींचे रस्ते, शहराच्या नळपाणी योजनेसाठी ४८ कोटींचा निधी, नाट्यगृह, ही विकासकामे प्रगतीपथावर आहेत. परंतु शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपले नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच २० वर्षांचा संघर्ष संपणार असून आता खेडच्या विकासासाठी एकत्र काम करणार असल्याची ग्वाही ना कदम यांनी देखील याप्रसंगी दिली.
यावेळी प्रभाग क्र. १० येथील नगरसेवक पदाचे उमेदवार आरिफ मुल्लाजी आणि रेश्माताई खतीब यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, कुंभार आळी, प्रभाग क्र. ९ मधील भूषण चिखले आणि रसिकाताई खेडेकर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, प्रभाग क्र. ७ मधील भाजपा उमेदवार स्वप्नालीताई चव्हाण आणि शिवसेना उमेदवार स्वप्नील सैतवडेकर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. तसेच निवडणूक प्रचारार्थ प्रभाग क्र. ७, ९ आणि १० मधील मतदारांची भेट घेतली. माजी जि.प.बांधकाम सभापती अरुण उर्फ अण्णा कदम, भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हा निवडणूक समन्वयक वैभवजी खेडेकर, माजी नगरसेवक संजय मोदी, माजी नगरसेविका संगीता कावणकर, श्रीकांत मुद्राळे, भालचंद्र साळवी, भरत कार्ले, अरुण पके, रमेश कावणकर, राकेश चव्हाण, तसेच सर्व महायुती पदाधिकारी आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.