loader
Breaking News
Breaking News
Foto

कोलझर तळकट भागात जंगली हत्ती कळपाचा धुमाकूळ, मोठ्या प्रमाणात बागायती नुकसान

दोडामार्ग (प्रतिनिधी) : गेल्या २३ वर्षापासून दोडामार्ग तालुक्यात जंगली हत्ती उपद्रव सुरू आहे. तिलारी खोऱ्यातील अनेक गावात कोट्यवधी रुपये नुकसान केले. तेव्हा पासून जंगली हत्ती हटाव मोहीम मागणी केली जात आहे. पण उपाययोजना नावाखाली वायफळ खर्च केला फक्त आश्वासन पलीकडे काही झाले नाही. मोर्ले, केर गावात धुमाकूळ घालणारा कळप गेले काही महिने तळकट, कोलझर, भागात धुमाकूळ घालत आहे. मंगळवारी रात्री तळकट कोलझर भागात हत्ती कळपाकडून मोठ्या प्रमाणात सुपारी, नारळ, केळी, झाडांचे नुकसान करण्यात आले. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वन विभाग प्रशासन यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तळकट येथील महेश जानबा देसाई यांच्या बागेत गेल्या चार वर्षापासून जंगली हत्ती बागेतून येतात जातात यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. मंगळवारी मोठ्या नारळाच्या झाडासह लहान झाडांचे नुकसान केले. एका रात्रीत लाखो रुपये नुकसान केले आहे. बागायती उपजिवीका साधन असल्याकारणाने खाण्यापिण्याची वांदे झाले आहेत त्यामुळे सरकारने याचा विचार करावा. महेश देसाई याने वीस वर्षांपूर्वी वनरक्षकची परीक्षा दिली होती. त्यात पास झाला, इंटरव्यू पास झाला. ऑर्डर मिळणार त्यावेळी कोकण दुय्यम मंडळ कॅन्सल झालं त्यामुळे तो बेकार आहे. शिवाय आता बागायती नुकसान होत आहे त्यामुळे जगणे मुश्किल झाले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg