loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणचे ‘जाणते राजे’ रमेशभाई कदम बहुमताने विजयी होणार!

चिपळूण - चिपळूणचे ‘जाणते राजे’ म्हणून चिपळूणकर ज्यांना प्रेमाने साद घालतात असे चिपळूणचे भूतपूर्व आमदार व भूतपूर्व नगराध्यक्ष श्री. रमेशभाई कदम यांना चिपळूण नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरल्यापासून फार मोठा पाठींबा मिळत असल्याचे चित्र दिसून येते. त्यांनी प्रचारात मोठी मुसंडी मारली असून सर्व वयोगटातील मतदार त्यांना पाठींबा देत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते शिवसेना (उध्दव ठाकरे) व राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांना मनसेने एकमुखी पाठींबा जाहीर केला आहे. श्री. राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने श्री. रमेशभाई कदम यांना पाठींबा जाहीर केल्याने रमेशभाईंची ‘कुमक’ मजबुत झाली असे मत चिपळूणमध्ये व्यक्त करण्यात आले. श्री. रमेशभाई कदम यांचा विविध क्रीडा व अन्य मंडळांशी निकटचा संबंध आहे त्यामुळे चिपळूणमधील विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि क्रीडा मंडळांनी त्यांना एकमुखी पाठींबा जाहीर केला आहे.

टाइम्स स्पेशल

श्री. रमेशभाई कदम हे सुमारे ४० वर्षांपासून चिपळूणच्या राजकारणात कार्यरत आहेत. एक प्रशासन कुशल व अनुभवी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते चिपळूणचे नगराध्यक्ष होते, त्यांच्या कार्यकाळात चिपळूणमध्ये अनेक विकास कामे संपन्न झाली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांना मिळालेला मोठा प्रतिसाद हा त्यांचा विजय मानला जात आहे. रमेशभाई कदम हे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा दमदार आत्मविश्‍वास राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उध्दव ठाकरे) व मनसे या पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg