loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज: २ डिसेंबरला मतदान

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मतदान यंत्रे (ईव्हीएम) सील केली आहेत, असे सांगितले. सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर पाटील यांनी यावेळी बोलताना मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती दिली. मतदारांना एकूण तीन पदांसाठी मतदान करायचे आहे आणि त्यासाठी तीन वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका वापरण्यात येणार आहेत: ​अध्यक्ष (नगराध्यक्ष) पदासाठी: फिकट गुलाबी रंगाची मतपत्रिका. ​सदस्य - अ (नगरसेवक) पदासाठी: पांढरा रंगाची मतपत्रिका. ​सदस्य - ब (नगरसेवक) पदासाठी: फिकट निळा रंगाची मतपत्रिका आहे. ​श्रीधर पाटील यांनी मतदारांना मतदान पूर्ण झाल्याची खात्री कशी करावी हे स्पष्ट केले. मतदानाचे ​अध्यक्षपदासाठी बटण दाबल्यावर लाल बटण पेटेल. ​सदस्य - अ पदासाठी बटण दाबल्यावर लाल बटण पेटेल. ​सदस्य - ब पदासाठी फिकट निळ्या मतपत्रिकेवर बटण दाबल्यानंतर लाल बटण पेटून 'डीप' असा आवाज आल्यानंतरच मतदान पूर्ण होईल,याची खात्री करून घ्यावी असे आवाहन केले आहे.

टाइम्स स्पेशल

प्रत्येक मतदाराला अध्यक्षपदासाठी एक आणि सदस्य पदासाठी दोन, अशी एकूण तीन मते देण्याचा अधिकार आहे. ​तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सावंतवाडी नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व मतदारांना या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदान करण्याचे आणि लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg