loader
Breaking News
Breaking News
Foto

महाड तालुक्यात मुंबई दारूबंदी विभाग भरारी पथकाची कारवाई; चालकासह १ ताब्यात

संगलट (खेड) (प्रतिनिधी) - महाड तालुक्यातील मुंबई- गोवा महामार्गावर सापळा रचून तालुक्यातील दासगाव हद्दीत गावातील एका ट्रकमधून एक कोटी साठ लाख रुपयाची विनापरवाना गोव्यातील दारू जात केली आहे. महामार्गावर मागील काही दिवसात दारूबंदी विभागाकडून करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई मानण्यात येत आहे. दारूबंदी विभाग भरारी पथक मुंबई यांना गोवा ते मुंबई बिना परवाना दारू घेऊन एक टुक जाणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी महाड तालुका हद्दीत महामार्गावर सापळा रचला. (आर जी ३६ जी बी १२७७) या ट्रकचा महाड वरून पाठलाग करत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव गाव हद्दीत थांवून कसून चौकशी केली असता या ट्रकमध्ये अंदाजे १३०० रॉयल सिलेक्ट या दारूचे बॉक्स सापडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ट्रकचा चालकाला ट्रकसह ताब्यात घेण्यात आले आहेय महाड मधील दारूबंदी कार्यालय येथे पुढील कारवाईसाठी नेण्यात आले असल्याची माहिती या भरारी पथकाचे उपनिरीक्षक शहाजी गायकवाड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी दिली आहे. गोवा राज्यातून हा ट्रक मुंबई येथे जात असल्याची माहिती भरारी पथकाचे उपनिरीक्षक शहाजी गायकवाड यांनी दिली आहे. महाड परिसरातील ही त्यांची पहिली तर या वर्षातील दुसरी कारवाई असल्याचे त्यांनी नमूद केले. या कारवाईमध्ये भरारी पथकाचे पोलीस उप निरीक्षक शहाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष गोंदकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल चिलयर, पोलीस कॉनटेबाल चौगुले यांचा समावेश आहे.

टाइम्स स्पेशल

हा टूक ताब्यात घेतल्यानंतर दारूबंदी कार्यालय महाड या ठिकाणी नेण्यात आले आहे त्या ठिकाणी संपूर्ण तपासणी नंतर या ट्रक मध्ये दारूचे खोके नक्की किती आहेत आणि याची किंमत किती आहे हे निश्चित होईल. मागील काही महिन्यात दारुबंदी विभागाकडून महाड परिसरामध्ये करण्यात आ लेली सर्वात मोठी कारवाई मानण्यात येत आहे. संबंधित चालक व अन्य इसमांना सोमवाप्नी महाड न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती उपनिरीक्षक शहाजी गायकवाड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

एक कोटी साठ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg