loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुडमध्ये उत्साही वातावरणात मतदान पार

मुरुड (राजीव नेवासेकर)- मुरुड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सकाळी उत्साहात सुरुवात झाली. मतदान केंद्रावर सकाळच्या वेळी कमी प्रमाणात गर्दी दिसून येत होती, नंतर गर्दी व्हायला लागली. काही मतदार केंद्रावर मतदानासाठी बाहेर रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसून आले. रायगड पोलिस उप अधीक्षक पुष्कराज सुर्यवंशी, मुरुड पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलिस शिपाई मकरंद पाटील यांनी मतदार केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. श्रीमती प्रेमा पांडुरंग विहूरकर (८५) कोळीवाडा मुरुड या वृद्ध महिलेने आपल्या मतदानाचा हक्क बजावला. उत्साही वातावरणात मुरुड शहरात मतदान पार पडले. नेहमीप्रमाणेच शांतता व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg