रत्नागिरी/अलिबाग/सावंतवाडी- (प्रतिनिधी)- गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा धुरळा उठला होता. आज हा प्रचाराचा धुरळा खाली बसणार आहे. सर्वच पक्षांनी जोरदार ताकद लावली आहे. चिपळूणमध्ये रमेशभार्ई कदम तर राजापूरमध्ये हुस्नबानो खलिफे यांनी प्रचाराचा उच्चांक गाठला आहे, तसेच रत्नागिरीमध्य शिल्पा सुर्वे या महायुतीच्या उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसते. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, तर रत्नागिरी जिल्ह्यात दोन शिवसेनेमध्ये आणि सिंधुदुर्गात शिवसेना भाजपात जोरदार चढाओढ आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी जोरदाररित्या विरोधकांवर हल्लाबोल केला. लांज्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांना लांजा-कुवे संघटन आणि महाविकास आघाडीचे मोठे आव्हान आहे तर देवरुख नगरपंचायतमध्ये यावेळी महाविकास आघाडी एकतर्फी दिसुन येत आहे. गुहागर नगरपंचायतमध्ये शिवसेना उबाठाने भाजपाला रोखून धरले आहे. खेड नगरपालिकेत रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वात एकतर्फी यश सेना-भाजपाला मिळेल असे म्हटले जात आहे. रोहा शहरात राष्ट्रवादीला शिवसेनेने आव्हान उभे केले आहे, तर मुरुडमध्ये राष्ट्रवाद कॉंग्रेस आघाडीवर आहे. अलिबागमध्ये शेकाप, कॉंग्रेस आघाडीसमोर भाजपाचे आव्हान उभे आहे. कर्जत व खोपोली निवडणूकीत राष्ट्रवादीचे प्राबल्य वाढताना दिसत आहे. महाडमध्य तिरंगी लढत होणार आहे. वेंगुर्ले, मालवण, कणकवली या ठिकाणच्या निवडणूकीत शिवसेनेसमोर भाजपचे आव्हान आहे. सावंतवाडीत भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे.

























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.