loader
Breaking News
Breaking News
Foto

​वकिलीचा अनुभव आणि समाजकार्याची तळमळ: सावंतवाडीच्या विकासासाठी सज्ज - ॲड. निता सावंत कविटकर

सावंतवाडी: वकिलीच्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून कायदेविषयक ज्ञान, प्रशासकीय कौशल्ये आणि जनसंपर्काची उत्तम जोड मिळाली आहे, जी आता सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्याची तयारी शिवसेना पक्षाने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिलेल्या ॲड. निता सावंत कविटकर यांनी दर्शवली आहे. वडिलांच्या एसटी महामंडळातील नोकरीमुळे जन्मापासून सावंतवाडी शहरात रमलेल्या आणि याच मातीत शिक्षण घेतलेल्या ॲड. निता सावंत कविटकर यांनी आपली उमेदवारी केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक आणि विकासात्मक परिवर्तनाची नांदी असल्याचे सांगितले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून सावंतवाडीच्या विकासाचे ध्येय स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, "सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास, रोजगार, आरोग्य, स्वयंरोजगार आणि पायाभूत सुविधांची निर्मिती, हे माझे प्राथमिक उद्दिष्ट असेल." आमदार दीपक केसरकर यांच्या विकास संकल्पनेचा प्रभाव त्यांच्या विचारांवर स्पष्टपणे दिसतो. "आमदार दीपक केसरकर यांच्यामुळे सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना मला जवळून पाहता आली, आणि ही संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, आणि आमदार दीपक केसरकर यांच्या विविधांगी विकासाच्या संकल्पना पुढे घेऊन जाताना, अनुभवी आणि अभ्यासू सहकाऱ्यांशी समन्वय साधून सावंतवाडी शहराचा सर्व पातळ्यांवर विकास साधला जाईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

सावंतवाडीची ओळख असलेल्या लाकडी खेळण्यांबाबत बोलताना त्या विशेषतः उत्साही होत्या. "लाकडी खेळणी ही सावंतवाडीची स्वतंत्र ओळख आहे. आज ही कला जागतिक नकाशावर प्रसिद्ध झाली आहे. या कलेला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी मी पुढाकार घेईन," असे त्या म्हणाल्या. ​शहराची एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्यावर भर देताना, त्या म्हणाल्या की, "लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास, रोजगार, आरोग्य, स्वयंरोजगार, पायाभूत सुविधा यावर भर देताना नागरिकांसाठी सुविधांची निर्मिती आणि सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मी सतत प्रयत्न करेन. सावंतवाडी शहरवासियांना मी पूर्ण वेळ नगराध्यक्ष म्हणून उपलब्ध राहीन आणि शहराला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करेन."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg