loader
Breaking News
Breaking News
Foto

आजपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी नवा नियम लागू, मराठी येत नसेल तर लायसन्स रद्द होणार

मुंबई - महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालवणार्‍या चालकांसाठी आता मराठी भाषा येणे अनिवार्य होण्याची शक्यता आहे. मराठी भाषेचे किमान व्यवहारज्ञान नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येणार असून, नियमांचे पालन न केल्यास परवाना किंवा लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जाहीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे व्यवहारज्ञान असणे आवश्यक करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला होता. चालकांना मराठी शिकण्यासाठी आणि त्याची प्राथमिक चाचणी पूर्ण करण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. आता १५ ऑगस्टनंतर या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याची भूमिका परिवहन विभागाने घेतली आहे. रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक इतके मराठीचे ज्ञान असणे अपेक्षित आहे. प्रवाशाचा पत्ता समजून घेणे, मार्गाबाबत संवाद साधणे, भाड्याची माहिती देणे आणि सामान्य संभाषण करणे, यासाठी आवश्यक असलेले ‘फंक्शनल मराठी’ चालकांना येणे अपेक्षित असल्याचे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

या निर्णयामागे महाराष्ट्रात प्रवासी आणि चालक यांच्यात स्थानिक भाषेत संवाद सुलभ व्हावा, हा उद्देश असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील एक लाखाहून अधिक बिगर-मराठी भाषिक रिक्षा-टॅक्सी चालकांनी तीन महिन्यांचे व्यवहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केल्याची माहिती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg