loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुक्यातील रुखी मराठी शाळेची विद्यार्थीनी हंसिता भागणे हिचे स्कॉलरशिप परीक्षेत यश

आगरवायंगणी - इतिहास घडत नसतो, घडवावा लागतो. या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषद रुखी मराठी शाळेच्या इतिहासात प्रथमच घडले. इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षेत शाळेच्या विद्यार्थीनीने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शैक्षणिक वर्ष २०२५/ २०२६ मधील एप्रिल २०२६ मध्ये इयत्ता चौथीची स्कॉलरशिप परीक्षा झाली. या परीक्षेमध्ये शाळेची विद्यार्थीनी हंसिता समीर भागणे सहभागी झाली होती. शाळेत मितभाषी असणारी हंसिता अभ्यासात कायम अग्रभागी असायची. शिक्षकांच्या मार्गदर्शाखाली दररोज अभ्यास करून एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये २१० गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.

टाईम्स स्पेशल

शाळेच्या इतिहासात हा सूवर्णयोग प्रथमच प्राप्त झाला आहे. स्वतःचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे पाठबळ यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. तिच्या यशामुळे शाळेत व रुखी गावात आनंदाचे वातावरण झाले आहे. सरपंच व सदस्य ग्रामपंचायत रुखी, ग्रामिण गावदेवी विकास मंडळ रुखी, शाळा व्यवस्थापन समिती रुखी मराठी व युवावर्ग रुखी या सर्वांकडून तिचे अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg