देवळे (प्रकाश चाळके) - मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेने 11 राज्य पातळीवरील पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२६ जाहीर केले आहेत.या पुरस्कारांची घोषणा संघटनेचे केंद्रीय सचिव अतुल होनकळसे, प्रदेश सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत, प्रदेशाध्यक्ष एड. विठ्ठल मोघे यांनी सोमवारी जाहीर केली आहे. ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल ही पत्रकार संघटना मागील 25 ते 30 वर्षापासून कार्यरत असून दर वर्षी पत्रकार दिनी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करीत असते, याच बरोबर सामाजिक क्षेत्रात ही सामाजिक बांधिलकी म्हणून नेहमीच पुढाकार घेते. त्यानुसार या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा पुरस्कार वितरण सोहळा यंदा मुंबई येथील गांधी बुक सेंटर येथे 20 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत पार पडणार आहे.
या पुरस्कारात आचार्य बाळ शास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार नांदेड येथील दैनिक स्वतंत्र वार्ता चे कार्यकारी संपादक कालिदास अंनतोजी यांना जाहीर झाला तर संपादक नानासाहेब जोशी यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार रत्नागिरी येथील वरिष्ठ पत्रकार मकरंद भागवत यांना जाहीर झाला. तसेच पांडुरंग भटकर यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार बुलढाणा चिखली येथील श्याम देशमुख यांना देण्यात येणार आहे. याशिवाय हेमंत कुलकर्णी मराठी संपादक पुरस्कार या नावाने दिला जाणारा यंदा परभणी पूर्णा येथील नागनाथ नागठाणे यांना दिला जाणार आहे. मधुकर लोंढे स्मृती साप्ताहिक पुरस्कार युवराज धनवडे दै. पुण्यनगरी कोल्हापूर यांना दिला जाणार आहे. नवीन सोष्टे स्मृती मराठी वार्ताहर पुरस्कारासाठी अकोला येथील बाळकृष्ण नेरकर यांनी निवड झाली. तर मधू रावकर शहर वार्ताहर पुरस्कारासाठी ठाणे येथील महादेव माने यांची निवड करण्यात आली. तसेच जयानंद मठकर पुरस्कारासाठी पुणे येथील अमरसिंग परदेशी यांची निवड झाली.
शरद दादा बोरकर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी राजू रणवीर तर दलित मित्र रमाकांत आरते पुरस्कारासाठी रायगड येथील सुभाष पाटील तर राज्यस्तरीय दर्पण प्रेरणा पुरस्कारासाठी परभणी येथील मराठवाडा केसरीचे कार्यकारी संपादक सत्यजित गावंडे यांनी निवड झाली. याशिवाय जीवन गौरव पुरस्कारासाठी मालाड येथील निसार अली सय्यद तर पनवेल येथील संजय कदम या दोघांची निवड करण्यात आली. यंदा यात एका पुरस्काराची भर पडली आहे.




















.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.