रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून, शिवसेना शिंदे गटानेही आता प्रभागनिहाय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक १६ ‘ब’ मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहेल मुकादम आणि रुखसार खान यांनी आज शिवखोल मोहल्ला येथून आपल्या प्रचारफेरीचा आणि जनसंपर्काचा जोरदार शुभारंभ केला. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवखोल मोहल्ला येथील मान्यवरांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात झाली. 'शिवसेना झिंदाबाद' आणि 'विकासाला साथ, धनुष्यबाणाला मत' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या उत्साही प्रतिसादात ही प्रचारफेरी प्रभागातील मुख्य रस्त्यांवरून आणि गल्लोगल्लीतून पुढे सरकली.
यावेळी दोन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांशी चर्चा करून त्यांचे आशीर्वाद घेतले, तसेच प्रभागातील पाणी, रस्ते आणि स्वच्छतेसंबंधीच्या समस्या जाणून घेतल्या. उमेदवार सुहेल मुकादम आणि रुखसार खान यांनी यावेळी बोलताना, निवडून आल्यास प्रभागातील प्रलंबित विकासकामे प्राधान्याने मार्गी लावण्यावर आपला भर राहील, असे आश्वासन मतदारांना दिले. मतदारांनी दोन्ही उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे पुष्पहार घालून स्वागत केले. महिला मतदारांचा प्रतिसादही लक्षणीय होता, ज्यामुळे प्रभाग १६ 'ब' मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे दिसून आले. शिवखोल मोहल्ला येथून सुरू झालेल्या या प्रचाराला नागरिकांचा मोठा सहभाग मिळाला. मतदारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे दोन्ही उमेदवार प्रभागात आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.