loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली येथील नागरिकांचे १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी पंचायत समितीसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

सावंतवाडी, (प्रतिनिधी) - इन्सुली (ता. सावंतवाडी) गावातील ग्रामपंचायत आणि इतर विविध योजनांअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची प्रलंबित बिले तात्काळ मिळावीत, या मागणीसाठी इन्सुली येथील स्थानिक नागरिकांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील निवेदन गटविकास अधिकारी (वर्ग-१), पंचायत समिती सावंतवाडी यांना देण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, इन्सुली गावातील प्राथमिक शाळा इमारत दुरुस्ती, रस्ते डांबरीकरण, गटार कॉंक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे, नळ योजना दुरुस्ती आणि अंगणवाडी कामांसह अनेक विकासकामे मुदतीत व पूर्ण गुणवत्तेसह पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र, ही कामे पूर्ण होऊनही प्रशासनाकडून त्यांची बिले प्रदीर्घ काळापासून प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. प्रलंबित बिलांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही व शांततेच्या मार्गाने १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत हे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.

टाईम्स स्पेशल

या निवेदनावर रामचंद्र चराटकर, कुणाल पोकळे, ऋषिकेश पेडणेकर, सचिन परब, नंदकिशोर कोचरेकर आदींच्या सह्या आहेत. तसेच या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषद अध्यक्ष (सिंधुदुर्ग), मुख्य कार्यकारी अधिकारी (जि. प. सिंधुदुर्ग), पोलीस निरीक्षक (बांदा पोलीस ठाणे) आणि प्रशासक (ग्रामपंचायत इन्सुली) यांना माहिती व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg