loader
Breaking News
Breaking News
Foto

संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सीमाभागात सभा घेणारे रामदास कदम - नितीन बानगुडे पाटील यांची २० वर्षानंतर निर्दोष मुक्तता; बेळगांव-खानापूर न्यायालयाचा निकाल

बेळगाव - २००६ साली सीमा प्रश्नाबाबत बेळगांव, धारवाड, निपाणी, बिदरीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, या मागणीसाठी शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदम यांना बेळगावमध्ये पाठविले होते. त्यावेळी बेळगाांव खानापूर येथे प्रचंड मोठी जाहिर सभा झाली होती. त्याआधी बेळगाांव येथील मराठी महापौर याांच्या तोंडाला काळे फासण्याचे कामही काही कन्नड मुुंडांनी केले होते. त्या धर्तीवरती शिवसेनाप्रमुख यांच्या आदेशानुसार बेळगांव येथे जाऊन रामदास कदम व नितीन बानगुडे पाटील यांनी सभा घेतली होती. सलग २० वर्षांनी सदर केसचा निकाल लागला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर येथे २००६ साली सीमा प्रश्नासंदर्भात मेळावा घेण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील नेते या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी कर्नाटक शासनावर भाषणातून हल्लाबोल केला होता. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्याांच्यावर खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाची सुनावणी पूर्ण होऊन खानापूर न्यायालयाने रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची मंगळवार दि. ११ ऑगस्ट, २०२६ रोजी निदोर्ष मुक्तता केली आहे. वकील शामसुंदर पत्तार, हेमराज बेंच्चन्नावर यांनी काम पाहिले.

टाईम्स स्पेशल

२००६ साली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा प्रश्नासंदर्भात मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला होता. या प्रक्षोभक भाषणाच्या विरोधात खानापूर पोलीसांनी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील याांच्यावर भारतीय दंडसंहिता कलम १५३ आणि १५३/ए अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयाची सुनावणी खानापूर न्यायालयात सुरू होती. रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील हे या सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे खानापूर न्यायालयाने या दोघांवर पकड वॉरंट जारी केले होते. यावेळी समिती कार्यकर्ते यशवंत बिरजे आणि महादेव घाडी यांनी कोर्टात जामीन राहिले होते. त्यावेळी खानापूर न्यायालयाने रू. १० लाख रूपयाच्या जामीनावर रामदास कदम यांना सोडले होते. त्यानंतर सलग सुनावणी होऊन मांगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी खानापूर न्यायालयाने पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg