loader
Breaking News
Breaking News
Foto

पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; काजू बागा उद्ध्वस्त, कंपाऊंडची मोडतोड

तिलारी (प्रतिनिधी) : पाळये परिसरात हत्तींच्या धुमाकुळाने शेतकरी आणि बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींच्या कळपाने गावातील काजू बागांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नासधूस केली असून, बागांचे नुकसान करण्याबरोबरच कंपाऊंडचीही मोडतोड केली आहे. लक्ष्मण दळवी यांच्या काजू बागेत घुसलेल्या हत्तींनी काजूच्या झाडांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. त्यानंतर अजय सावंत यांच्या काजू बागेतही हत्तींनी धुडगूस घालत काजूची झाडे उद्ध्वस्त केली. एवढ्यावरच न थांबता त्यांच्या जाळीच्या कंपाऊंडचीही मोडतोड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, फर्नाडिस यांच्या शेतजमिनीच्या चिरेबंदी कंपाऊंडची हत्तींनी अक्षरशः वाट लावली असून, या नुकसानीमुळे त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. मेहनतीने उभी केलेली काजू बाग आणि सुरक्षिततेसाठी उभारलेले कंपाऊंड काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने संबंधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाळये परिसरात हत्तींचा वावर सातत्याने वाढत असून, शेती-बागायतीचे नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी हत्तींचा कळप गावाच्या आसपास फिरत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत.

टाईम्स स्पेशल

हत्तींचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीवर हत्तींचा घाला पडत असताना वनविभाग नेमकी कोणती ठोस पावले उचलणार? हा प्रश्न आता पाळये ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg