loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुखच्या श्री रामेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करणार - हनीफ हरचिरकर

देवरुख (सुरेश सप्रे) - देवरूख मधील सप्तलिंगी नदीकाठावरील ऐतिहासिक व धार्मिक आस्था असणार्‍या श्री रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आम. शेखर निकम यांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन करणार, असे हनिफ हरचिरकर त्यांनी स्पष्ट केले. देवरुख नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक ११ मधील स्थानिक बैठकीत मधली आळीतील रहिवाशांनी मांडलेल्या पारंपरिक मागणीला महत्त्व देत महायुतीचे उमेदवार हनिफ हरचिरकर यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणाच केली. देवरुखचे नाव घेतले की सप्तलिंगी नदी, तिच्या काठावर विसावलेले प्राचीन देवस्थान असणारे श्री रामेश्वर मंदिर या मंदिरात परिसरात अनेक पिढ्यांची संस्कृती, समृद्ध इतिहास आहे. येथे धार्मिक विधी केले जातात. यात सामाजिक एकता गुंफलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक नागरिकांनी वर्षानुवर्षे या मंदिराच्या दुरुस्तीची मागणी केली होती. मधली आळीतील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांनी बैठकीत ही मागणी पुन्हा एकदा मांडत आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री रामेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करताना मूळ धाचा, प्राचीन वास्तुकला आणि सांस्कृतिक स्वरूप अबाधित ठेवूनच काम केले जाईल. देवस्थानाच्या पवित्रतेला हात न लावता सुशोभित, आकर्षक आणि भव्य रूप देण्याचा प्रयत्न करून सप्तलिंगी काठावर नवीन धार्मिक–पर्यटन केंद्राची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत असे ही हरचिरकर यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

सप्तलिंगी काठावर असलेल्या या प्राचीन मंदिराचा नवा, परंतु संस्कृती जपणारा आविष्कार देवरुख नगरपंचायतच्या विकसित आणि आदर्श शहराच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरू शकतो. वॉर्ड ११ मधील बैठकीतून उमेदवार हनिफ हरचिरकर यांनी मांडलेला हा विकास दृष्टीकोन देवरुखच्या राजकीय पटलावर आला आहे. नगराध्यक्षपदासाठी मृणाल शेट्ये आणि वार्ड क्रं 11 मधून हनिफशेठ हरचिरकर या महायुती उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन आ. शेखर निकम यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg