खेड - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेड याठिकाणी अनुलोम आयोजित 'आपल्या संविधानाची पंच्याहत्तरी' हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अनुलोमचे उपविभाग जनसेवक मयुरेश पाटणकर, अनुलोमचे भाग जनसेवक वेदांग शितूत यांचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांच्या शुभहस्ते पुस्तक व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. अनुलोम म्हणजे अनुगामी लोकराज्य महा अभियान ही सामाजिक संस्था आहे. शासनाच्या योजना समाजातील योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे ही संस्था काम करते. समाजातील गरीब, मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाज धारकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार करणे आणि देशाला पोषक समाज घडवण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील असते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मयुरेश पाटणकर यांनी भारताच्या संविधानाची माहिती सांगितली. भारतीय संविधानाचे महत्त्व सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाची जाणीव करून दिली. भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली हे विद्यार्थ्यांना त्यांनी चित्रफितीच्या माध्यमातून समजावून सांगितले. या माध्यमातून भारतीय संविधान निर्मितीमागील महत्त्वाच्या घडामोडींचा विद्यार्थ्यांना परिचय झाला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय इ. मूल्ये दृढ करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत एक सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक देश असल्याचे मूल्यांद्वारे जाणीव करून दिली. नागरिकत्वाचे प्रकार, नागरिकांचे मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, नागरिकांची कर्तव्ये, आधारभूत तत्वे याविषयी सविस्तर माहिती सांगितली. शेवटी त्यांनी भारतीय संविधान हा एक आस्थेचा विषय असल्याने प्रत्येकाने त्याचे भान ठेवून कृती करावी असा संदेश दिला. सदर कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गावडे यांनी केले.



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.