loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा ‘फेम इंडिया—एशिया पोस्ट’च्या यादीत समावेश

रत्नागिरी - फेम इंडिया—एशिया पोस्टने प्रसिद्ध केलेल्या ताज्या यादीत महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या मानाच्या यादीत रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचाही समावेश झाल्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कायदा-सुव्यवस्था प्रभावीपणे राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, सक्षम व परिणामकारक नेतृत्व, नागरिकाभिमुख पोलीसिंग तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे, अशा विविध महत्त्वपूर्ण निकषांच्या आधारे या निवडी करण्यात आल्याचे प्रसिद्ध वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कार्यकाळात रत्नागिरी जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रभावी मार्गदर्शन करताना जनतेशी संवाद आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यावरही भर दिला जात आहे. रत्नागिरीसारख्या भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण जिल्ह्यात विविध प्रकारची आव्हाने असतानाही कायदा-सुव्यवस्था सक्षमपणे हाताळणे, गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे या दृष्टीने पोलीस प्रशासनाचे कार्य महत्त्वपूर्ण ठरते.

टाईम्स स्पेशल

‘फेम इंडिया—एशिया पोस्ट’च्या मानाच्या यादीत नितीन दत्तात्रय बगाटे यांचा समावेश होणे ही केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याची दखल नसून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठीही अभिमानाची बाब आहे. या सन्मानामुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कार्याला निश्चितच नवी प्रेरणा मिळणार आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांचे सर्व स्तरांतून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg