चिपळूण, (इकलाक खान) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात जास्त लांबीच्या चिपळुणातील उड्डाणपुलावर अखेर शेवटचा स्लॅब पडला असून पुलाचे काम पूर्ण झाले आहे. १.८४ किलोमीटर लांबी असलेल्या पुलावर तब्बल १८२ स्लॅब टाकण्यात आले आहेत. महामार्ग चौपदरी असला तरी भविष्यातील गरज ओळखून उड्डाणपुल २५ मीटर रूंदीचा ६ पदरी करण्यात आला आहे. बुधवारी १२ रोजी या उड्डाणपुलाचा अखेरचा स्लॅब पडल्याने उर्वरीत कामांना वेग येणार आहे. परंतु जोडरस्ता व अन्य काही कामे शिल्लक राहिल्याने दिवाळी नंतरच पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे.
चिपळुणातील उड्डाणपुलाच्या कामात सुरवातीला काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. महामार्गालगतच्या पाईपलाईन, तुटलेल्या मोर्या दुरूस्त करण्यातच बराचसा कालावधी गेला. सुमारे ४ वर्षापुर्वी बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच तो कोसळला होता. त्यानंतर उड्डाणपुलाच्या मुळ आराखड्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४० मीटर अंतरावरचे पिलर २० मीटरवरती उभारण्याचे ठरले. त्यानंतर अतिरीक्त पीलर टाकण्यात आले. मात्र या कामात बराचसा कालावधी निघून गेला. अखेर यंत्रणा व कामगार वर्ग वाढवून २ वर्षापुर्वी या कामाला जोमाने सुरवात करण्यात आली. चिपळूण बहादूरशेख ते थेट चिपळूण पंचायत समितीपर्यंत जोडरस्त्यासह अडीच किलोमीटर लांबीचा हा पूल असून उड्डाणपुलाच्या स्लॅबचे काम पुर्ण झाले आहे. बुधवारी शेवटच्या स्लॅब टाकण्यात आला.
आता या उड्डाणपुलाचा जोडरस्ता व अन्य कामांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. एकीकडे स्लॅबचे काम सुरू असतानाच जोडरस्त्याचे काम देखील सुरू ठेवण्यात आले होते. दोन्ही बाजूला जोडरस्त्याच्या भिंतीचे काम पुर्ण झाले आहे. येत्या काही दिवसात जोडरस्त्याच्या भरावाला सुरवात केली जाणार आहे. त्याशिवाय प्रांत कार्यालयाशेजारी देखील भरावाचे मोठे काम शिल्लक आहे. मात्र या कामात पावसामुळे अडचणी येत असल्याने त्यास विलंब होत आहे.पावसाचा जोर कमी झाल्याशिवाय जोडरस्त्याच्या भरावाचे तसेच काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करता येणार नाही. तसेच उड्डाणपुलावरील पथदीप, रंगकाम आणि डांबरीकरणाची कामे शिल्लक आहेत. भराव आणि डांबरीकरणाची कामे पावसाळ्यानंतर ऑक्टोंबरमध्येच होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सावापुर्वी उड्डाणपुल खुला करण्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नियोजन होते. मात्र भरावाची कामे अपुर्ण असल्याने दिवाळीनंतरच या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.





















1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.