खेड - येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास सहजीवन शिक्षण संस्थेचे खजिनदार विलासभाई बुटाला, संस्थेचे विश्वस्त व महाविद्यालयाचे चेअरमन अॅड. आनंदराव भोसले, आय.टी. विभागाचे संचालक उत्तमकुमार जैन, माजी प्राचार्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. जी. बी. सारंग, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. राजेश राजम यांनी लिहिलेले ‘अक्षरयात्रा: वाचन व लेखन कलेचा मंत्र व तंत्र’ या ई- पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या पुस्तकाचे प्रकाशन ‘एक सजग वाचक’ या नात्याने या महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असणाऱ्या योगिता बुटाला यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या प्रस्ताविकातून ग्रंथपाल डॉ राजेश राजम यांनी ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन त्यांच्या कार्याचा धावता आढावा घेतला व ग्रंथालयशास्त्रातील त्यांचे योगदान उपस्थितांना सांगितले. यावेळी पुस्तक प्रकाशनाचे उद्घाटक म्हणून बोलताना योगीता बुटाला यांनी वाचनाचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित करत, अनेक प्रसंग उभे केले. तसेच या पुस्तकाचे लेखक डॉ. राजेश राजम यांच्या पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. रंगनाथन जयंतीचे औचित्य साधत त्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास ज्ञानकोश व इतर पुस्तकांची भेट दिली. याच समारंभात सोशल मिडिया हबचे ही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच लवकरच ग्रंथालय परिचर या पदावरून निवृत्त होणारे विजय हुमणे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना चेअरमन अॅड.आनंदराव भोसले यांनी ग्रंथपाल डॉ.राजम हे ग्रंथालयात नेहमीच नवनवीन उपक्रम घेत असतात त्याबद्द्दल त्यांचे कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संचालक उत्तमकुमार जैन यांनी साहित्यिक भाषेत, हे पुस्तक म्हणजे नवोदित वाचक आणि लेखक यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल, याची खात्री व्यक्त केली. माजी प्राचार्य डॉ. जी. बी. सारंग यांनी या पुस्तकासाठी शुभेच्छा देताना वाचनाचे विविध पैलू सांगितले. संस्थेचे विश्वस्त विलासभाई बुटाला यांनी डॉ. राजेश राजम यांचे कौतुक करून त्यांच्याकडून अशाच उत्तमोत्तम साहित्याची आम्हा सर्वांना अपेक्षा आहे, असा आशावाद व्यक्त केला. या समारंभाचे आभारप्रदर्शन डॉ.आर. एस. भालेराव यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. अश्विनी शेठ यांनी केले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.