रत्नागिरी (वार्ताहर) : मराठा मंडळ, रत्नागिरी ही संस्था आपला सुवर्ण महोत्सव धुमधडाक्यात साजरा करीत असून यानिमित्ताने रविवारी २५ जानेवारी रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठा मंडळ, रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. रमेश चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाचा शुभारंभ रविवारी सकाळी निघणार्या एका भव्य मिरवणूकीने होणार असून त्यानंतर दिवसभर विविध कार्यक्रम संपन्न होतील. १९७५ साली मराठा मंडळ, रत्नागिरी या संस्थेची स्थापना झाली. संस्थेने आता आपल्या कारकीर्दीची ५० वर्ष पूर्ण केली असून सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून २५ जानेवारी रोजी मराठा भवन (तारांगणासमोर, जुना माळनाका, रत्नागिरी) येथे सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळी ६.४५ ते ८ या वेळात छ. शिवाजी महाराज पूजन व सवाद्य पालखी मिरवणूक निघणार आहे. मारुती मंदिर ते मराठा भवन अशी ही मिरवणूक निघेल. त्यानंतर सकाळी ८ ते १० या वेळात श्री सत्यनारायणाची महापूजा होणार आहे. त्यानंतर आई तुळजाभवानी मराठा महिला मंडळाच्यावतीने भजन सादर केले जाईल. सकाळी ११ ते १ यावेळात सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ होईल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष सुनिलदत्त देसाई हे करतील. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. त्याचप्रमाणे मंडळाला मदत करणार्या आणि उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे हे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून त्यांचे छ. शिवाजी महाराज एक महान व्यवस्थापक (शिवकालीन कृषी आस्थापना व दैनंदिन जीवनातील आचरण) या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश चव्हाण यांचे भाषण होईल. दुपारी १.३० ते २.३० यावेळात स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसर्या सत्रात दु. ३ वा. मराठा मंडळ, रत्नागिरीच्या वेबसाईटचे उद्घाटन होणार आहे. यावेळी भारतीय महसूल सेवेतील माजी ज्येष्ठ अधिकारी, निवृत्त उपसंचालक अंमलबजावणी संचलनालय (ईडी)चे डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांचे व्याख्यान होणार आहे. स्वप्नांच्या उंबरठ्यावरील युवक व भविष्याचा मार्ग याविषयावर ते मार्गदर्शन करतील. त्यानंतर मराठा मंडळातील ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात येईल.
तिसर्या आणि शेवटच्या सत्रात दुपारी ४ ते ५ या वेळात मराठा मंडळ, रत्नागिरी फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते होईल. या सत्रात स्त्री उद्योजकतेचा उद्याचा वेध या विषयावर सौ. बागवे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. सौ. रचना बागवे या आरएसी मिडीयाच्या संपादक असून या विषयाच्या त्या अभ्यासक आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मराठा समाजातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार केला जाईल. त्यानंतर सायंकाळी ६ ते ९.३० यावेळात सांस्कृतिक कार्यक्रम होतील. रात्रौ ९ ते ९.३० यावेळात स्नेहभोजन होऊन हा विशेष कार्यक्रम संपन्न होईल. २५ जानेवारी रोजी मराठा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा मंडळ, रत्नागिरी या संस्थेने केले आहे.













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.