loader
Breaking News
Breaking News
Foto

जांभरुण नं. 1 शाळेत पहिलीचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

जांभरुण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत पहिलीचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि दमाख्यात साजरा करण्यात आला. शाळेतील नवागत विद्यार्थ्यांचे फुगे, फुलं आणि गिफ्ट देऊन भरघोस स्वागत करण्यात आले. शिक्षणाच्या नव्या पर्वात या चिमुकल्यांचा आनंदाने प्रवेश घडवून आणण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9.00 वाजता गणेश वंदनेने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी सरपंच गौतम सावंत, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित सावंत, उपाध्यक्ष सौ प्रविणा साळूंखे, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सौ वैष्णवी साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषतः नवागत विद्यार्थ्यांसाठी सजवलेली वर्गखोली, बालगिते व नृत्य सादरीकरण, तसेच पालकांसाठी मार्गदर्शन सत्र या सर्वांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. सर्व विद्यार्थ्यांना पेढे व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक राजेश पवार यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत प्रेरणादायी भाषण केले. सरपंच सावंत यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक सहकार्याचे आश्वासन दिले. पालक प्रतिनिधींचीही सकारात्मक प्रतिक्रिया यावेळी मिळाली. कार्यक्रमात एक विशेष उपक्रम म्हणून प्रत्येक नवागत विद्यार्थ्याच्या पायाला रंग लावून पायाचे ठसे घेण्यात आले.

टाईम्स स्पेशल

तसेच ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष रावणंग, श्रीम यास्मिन कोतवाल यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता, आत्मविश्वास आणि आनंद निर्माण झाला. पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे ठरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg