loader
Breaking News
Breaking News
Foto

राज ठाकरेची साथ सोडा,काँग्रेसची उद्धव ठाकरे यांना ऑफर मात्र उद्धव सेना मनसेला 70 जागा देणार?

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकसाठी भारतीय जनता पक्षाने प्रभाग रचना प्रमाणे सर्वे केला आहे.या सर्वेमध्ये 100 पेक्षा जास्त जिंकण्याचा दावा केला आहे .तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने राज ठाकरे यांची साथ सोडण्याची ऑफर उद्धव ठाकरे यांना दिली आहे.महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना स्थान नसल्याची भूमिका काँग्रेस पक्षाकडून मांडण्यात आली आहे.आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकसाठी भारतीय जनता पक्षाने प्रभाग रचना प्रमाणे सर्वे केला आहे. या सर्वेमध्ये भाजपला 100 पेक्षा जास्त निवडून येण्याचा दावा केला आहे.या सर्वेमध्ये भाजपने महायुतीतील मित्रपक्षाचा समावेश केला नाही.BMC निवडणूक पूर्वी भाजपाने अंतर्गत सर्व्हे प्रसिद्ध केला आहे.यामध्ये महापालिकेत 100 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.ही आकडेवारी भाजपने स्वबळावर लढ्याच्या दृष्टीने जाहीर केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कांग्रेस पक्षाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांना मोठी ऑफर दिली आहे.आगमी निवडणुकीत राज ठाकरे यांची साथ सोडून सोबत येण्याची ऑफर दिली आहे.काँग्रेसने मनसेची साथ सोडा आणि आमच्यासोबत यावे असे आवाहन केले आहे.महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर देत मनसेला सोबत न घेण्याचा निर्णय घेतला आहे.मनसेची साथ सोडा आणि आमच्यासोबत या नाहीतर कॉंग्रेस स्वबळावर लढण्याचा पुनर्विचार करणार आहे असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

टाइम्स स्पेशल

मुंबईतील एकूण 227 पैकी तब्बल 157 जागा शिवसेना (ठाकरे गट) लढवणार असून 70 जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) देण्याची तयारी आहे.महापालिका निवडणूक जवळ येत असताना दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या गाठी अधिक वेगाने बसताना दिसत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg