केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा कुवे शहराचा सवार्ंगिण विकासासाठी आणि सर्वसामान्याच्या हितासाठी आमदार किरण सामंत यांनी घेतलेल्या त्यांच्या पुढाकाराला गावातील प्रतिष्ठित नागरीक, मानकरी, व्यापारी यांचा उत्स्फूर्त पाठींबा लाभत असल्यामुळे लांजा नगरपंचायत निवडणूकीत किरण सामंत यांच्या पॅनलचा विजय हा निश्चित असल्याचे उद्योजक विकास शेट्ये यांनी पत्रकाराजवळ बोलताना सांगितले.
लांजा नगरपंचायत निवडणूक २ डिसेंबर रोजी आहे. मोजकेच दिवस उतरल्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पदाधिकारी, अपक्ष उमेदवार यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आमदार किरण सामंत यांनी महायुतीचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील याची खात्री दिली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना विकास शेट्ये म्हणाले, लांजा कुवे शहराचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवुन मिवडणूका लढविल्या जात आहेत. लांजा शहराच्या विकासाचा मास्टर प्लॅन आमदार किरण सामंत यांनी तयार केला आहे.
लांजा गावचे प्रमुख मानकरी सुधाकर शेट्ये, कमलाकर गांधी, राजू कुरूप, सुभाष कुंभार, विठोबा लांजेकर, मयूर शेडे तसेच इतर सर्व मानकरी, उद्योजक शिवाजी कोत्रे, उद्योजक प्रदीपकुमार बेंडखळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये आदींसह प्रमुख नागरिक किरण सामंत यांच्या खंबीर पाठीशी उभे आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. किरण सामंत यांचे पॅनल शंभर टक्के विजयी होणार. लांजाला सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक बनवण्याची वचनबद्धता असून स्वच्छ लांजा अभियान नियमित कचरा संकलन व प्रक्रिया केंद्र, रस्त्यांचे डांबरीकरण, जलनिस्सारणाची शाश्वत सुधारणा, संपूर्ण नगरात उच्च दर्जाच्या एलईडी स्ट्रीटलाईट्स, पाणीपुरवठ्याचे शाश्वत समाधान, पाण्याची कमतरता असलेल्या भागांसाठी तातडीचे उपाय, जुनाट पाईपलाईन बदलून उच्च क्षमतेची नवीन लाइन, रेनवॉटर हार्वेस्टिंग व भूजल संवर्धन प्रकल्प, लांजा बाजारपेठ व्यापारसुलभता आणि सुशोभीकरण, बाजारपेठेतील गर्दी, पार्किंग व वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, व्यापार्यांसोबत समन्वय साधत सुविधा-वाढ, स्वच्छ, आकर्षक व तंत्रज्ञानाधारित व्यापार परिसर, युवकांसाठी संधी : रोजगार आणि कौशल्यविकास, आधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्रे, एमएसएमई, स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी मदत कक्ष, क्रीडा संकुल सुधारणा आणि खेळाडूंसाठी सुविधा, महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला सुरक्षा उपक्रम, सेल्फ-डिफेन्स कार्यशाळा, बालसुलभ उद्याने व शिकवणी केंद्रे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ सेवा केंद्र, आरोग्य शिबिरे, लांज्याच्या परिघ, पाडे आणि उपनगरांचा समतोल विकास, प्रत्येक वॉर्डातील पायाभूत सुविधा समान गतीने करणार, दुर्गम भागांत पाणी, रस्ते व सार्वजनिक सुविधा वाढविणार, स्थानिक गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवून कामांची अंमलबजावणी,पारदर्शक आणि उत्तरदायी नगरपरिषद सर्व कामांची माहिती नागरिकांसमोर सुलभपणे उपलब्ध होणार, ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली, निधीच्या वापरात पारदर्शकता आणि जबाबदारी रहाणार इत्यादी विकासाची कामे केली जाणार आहेत, असे शेट्ये यांनी सांगितले.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.