संगमेश्वर (सत्यवान विचारे) - जिल्हा मध्यवर्ती बँकेचे फणसवणे कळंबस्ते शाखेचे शाखाधिकारी शैलेश तुकाराम जाधव हे 30 वर्षाच्या सेवे नंतर सेवा निवृत्त झाले असुन त्यांना बँकेच्या फणसवणे शाखे तर्फे ग्रामस्थ्यांच्या उपस्थित निरोप देण्यात आला, त्यावेळी पांचक्रोशीती अणेक मान्यवर उपस्थित होते. शैलेश जाधव हे कोसुंब गावचे रहिवाशी असुन ते गेली अनेकवर्ष फणसवणे जिल्हा मध्यवर्ती शाखेत कार्यरत होते, अत्यंत मन मिळाऊ, प्रत्येकाशी आपुलकीने बोलणे या गुणांन मुळे ते परिसरात चांगलेच रूळले होते. मधनंतरी त्यांना शाखाधिकारी म्हणून बढती मिळाल्याने त्यांची नियुक्ती इतर शाखेत झाली होती. मात्र वर्षभरा पुर्वी या शाखेतील शाखाधिकारी रवींद्र रजपुतयांची बदली झाल्याने वरीष्ठानी या परिसरातील सर्वांच्या परिचत असलेले शलेश जाधव यांना पुन्हा फणसवणे शाखेत नियुक्ती केली.
जाधव यांची 29 नोव्हेंबर 2025 रोजी वयाची 58 वर्ष पुर्ण झाल्याने त्यांना नियमानुसार निवृत्त करणेत आले, त्यांची एकूण 30 वर्ष सेवा झाली असुन त्या पैकी जास्तीतजास्त सेवा ही फणसवणे शाखेत झाल्याने फणसवणे शाखेच्या वतीने छोटासा निरोप समारंभ आयोजित करणेत आला होता. यावेळी आर डी सी बँकेचे संचाल राजेंद्र सुर्वे, राष्ट्रवादी पक्षाचे तालूका प्रमुख राजेंद्र पोमेंडकर, तालुका इन्स्पेक्टर. तुषार साळुंखे, संपर्क अधिकारी. संदेश पंदेरे, नविन व्यवस्थापक स्वप्निल कुवळेकर, नायरी सोसायटी सचिव महेंद्र होडे आदीमान्यवरांसोबत पंचक्रोशीतील अणेक ग्रामस्थ शैलेश जाधव यांना निरोप आणि शुभेच्छा देण्या साठी उपस्थित होते.






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.