loader
Breaking News
Breaking News
Foto

मतदानाला काही तास शिल्लक असताना नेत्यांची आर्थिक प्रलाभने, निवडणूक आयोगाकडून दखल

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु असताना वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री शिरसाठ, मंत्री जयकुमार गोरे, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक नेत्यांकडून मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखविणारी वक्वव्ये करण्यात आली आहेत. अशा वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडून मागविण्यात आल्याने आता या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता या नेत्यांना मतदारांना आर्थिक प्रलोभनं देणारी वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत प्रलोभने देणाऱ्या २० नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी वक्तव्य केली आहेत, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्काळ अहवाल मागवला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg