loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन

आबलोली (संदेश कदम) - पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्षाच्या वतीने "स्पर्धा परीक्षा मधील असणारी संधी" या विषयावर मागील वर्षी यूपीएससी परीक्षेमध्ये निवड झालेले आणि पश्चिम बंगाल मध्ये नियुक्त झालेले बिरदेव डोणे (आयपीएस अधिकारी) यांचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सुरुवातीला आपल्या यशस्वी जीवनाचा वाटचाल सांगून त्यांच्या विद्यार्थी दशेतील त्यांचे अनुभव कथन केले. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कशाप्रकारे करावयाची आणि कोणत्या गोष्टी करावयाच्या की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीनुसार यश मिळेल हे स्पष्ट केले. स्वप्ने पहा पण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जी जिद्द लागते ती कायम ठेवा ती जर नसेल तर स्वप्ने पाहण्यात काही अर्थ नाही. यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षा किंवा जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वप्न पहा, स्वप्नाकडे जाण्याचा मार्ग निश्चित करा आणि निवडलेल्या मार्गावर सातत्य ठेवा या त्रिसूत्रीचा वापर केल्यास हमखास यश मिळेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास स्वप्न करणे अवघड नाही, असे सांगितले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना संख्यात्मक आणि गुणात्मक अभ्यासक्रम कसा करावा हे सांगून परीक्षा किंवा आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा अपयश येते परंतु त्या अपयशाचा सामना करता आले पाहिजे हे त्यांनी सांगितले. जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर आपल्याला कोणतेही आव्हान अशक्य नाही हे त्यांनी सांगितले. कोकणातील विद्यार्थी खूप हुशार आहेत, दहावी आणि बारावीच्या बोर्डामध्ये कोकणातील मुले पुढे असतात परंतु स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये ही मुले खूप मागे असतात. कोकणातील विद्यार्थ्यांनी केवळ मुंबईचा विचार न करता या ठिकाणी राहून स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमध्ये यशस्वी व्हावे असे सांगितले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड नाही त्यांना ज्यामध्ये आवड आहे त्यांनी कोकणामध्ये विविध प्रकारच्या संधी आहेत त्याचा उपयोग करून चांगल्या पद्धतीनुसार आपल्याला करिअर कसे करता हे सांगून सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांनी सकारात्मक पद्धतीने कसा करता येईल हे स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर कोणतेही आव्हान त्यांच्यासाठी अशक्य असते फक्त प्रामाणिक जिद्द असावी लागते. त्यासाठी आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी आपल्याला सहज यशस्वी होता येते हे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाच्या ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवले त्यांचा सत्कार बिरदेव डोणे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला कोल्हापूरहून आलेले वासुदेव कांबळे, तानाजी दळवी, रवींद्र खोत तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी ए देसाई वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस एस खोत तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी पवार हिने तर समारोप समृद्धी घाणेकर हिने केला. कार्यक्रमाच्या शेवटी अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा विषयी अनेक प्रश्न विचारले आणि त्याला समर्पक अशी उत्तरे बिरदेव डोणे सर यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg