loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड तालुका चर्मकार उन्नती मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर

देवगड (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाची देवगड तालुकास्तरीय बैठक शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल, देवगड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित प्रकाश जाधव हे होते. यावेळी देवगड तालुक्यासाठी नवीन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत सचिन शांताराम दहिबावकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच दशरथ भिकाजी मुणगेकर यांची उपाध्यक्षपदी, सचिन मनोज मुणगेकर यांची सचिवपदी, चंद्रकांत रामचंद्र मुणगेकर यांची खजिनदारपदी तर दशरथ भिकाजी मुणगेकर यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीत चर्मकार समाजाचे संघटन अधिक बळकट करणे, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना गती देणे, युवकांना समाजकार्यात सहभागी करून घेणे तसेच समाजाच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे कार्य करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नव्या कार्यकारिणीने समाजहिताच्या विविध योजना व उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. या बैठकीस मावळते तालुकाध्यक्ष रमेश महादेव चव्हाण, तसेच सदस्य देवेंद्र जाधव, विश्वनाथ गोपाळ शिरकर, दिपक यशवंत समजिसकर, विराज दिपक समजिसकर, मनोज मुणगेकर, दशरथ मुणगेकर, संतोष मुणगेकर, चंद्रकांत मुणगेकर, चित्रा मुणगेकर, कणकवली तालुका अध्यक्ष महेंद्र चव्हाण, तसेच जिल्हा युवा प्रमुख प्रकाश वाघेरकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. देवगड तालुक्यातील चर्मकार समाजाच्या संघटनात्मक व सामाजिक कार्याला नव्या कार्यकारिणीमुळे अधिक चालना मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg